रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे यंदाचे पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने २०२० सालचे विविध पुरस्कार आज (११ ऑगस्ट) जाहीर केले. कोणतेही अर्ज न मागवता विविध माध्यमांतून माहिती मिळवून हे पुरस्कार दिले जातात. पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये पत्रकार अरुण आठल्ये, डॉ. बाळकृष्ण पाध्ये, कीर्तनकार अनंत कर्वे, उद्योजक विनायक वाकणकर, वेदमूर्ती सुयोग पाध्ये आणि शिक्षिका सौ. अनघा प्रभुदेसाई यांचा समावेश आहे.

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार योगपटू स्वराली तांबेला जाहीर

रत्नागिरी : झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या स्मृतिदिनानिमित्त (१८ जून) दर वर्षी रत्नागिरीच्या कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार प्रदान केला जातो. या वर्षी हा पुरस्कार चिपळूणची योगपटू स्वराली तांबे हिला जाहीर करण्यात आला आहे; मात्र या वर्षी करोना संकटकाळामुळे पुरस्कार वितरण समारंभ प्रलंबित ठेवण्यात आला आहे.