अत्यंत शांत व प्रसन्न वातावरण असलेली वेगवेगळ्या देवतांची विशाल मंदिरे हे कोकणाचे एक वैशिष्ट्य. कोकणाला देवभूमी म्हटले जाण्याचे कदाचित हेही एक कारण असावे. यापैकी अनेक मंदिरे जुन्या काळच्या अतिशय सुंदर अशा काष्ठशिल्प परंपरेचा समृद्ध वारसा आहेत. मंदिरांचे आयुष्य वाढवण्यासाठी त्यांचा जीर्णोद्धार करण्याचे ‘फॅड’ सध्या आले आहे; मात्र जुनी मंदिरे पाडून सिमेंटची मंदिरे उभी करणे म्हणजे हा अनमोल वारसा स्वतःहून उद्ध्वस्त करण्यासारखेच आहे. या पार्श्वभूमीवर, या विषयाचे अभ्यासक डॉ. नितीन हडप यांनी लिहिलेला, माणगाव (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री यक्षिणी मंदिर आणि कोकणातील अन्य काही वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांतील काष्ठशिल्पांची थोडी ओळख करून देणारा हा लेख