अवैधरीत्या गोवंश मांस बाळगल्याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका व्यक्तीला अटक केली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
अवैधरीत्या गोवंश मांस बाळगल्याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका व्यक्तीला अटक केली.
रत्नागिरीतील ‘अनबॉक्स युअर डिझायर’ या फूड डिलिव्हरी उद्योगाचा सहावा वर्धापनदिन नुकताच झाला. त्या निमित्ताने, ‘अनबॉक्स’तर्फे रत्नागिरी पोलीस दलाला सीसीटीव्ही यंत्रणा भेट देण्यात आली.
कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेतर्फे आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत जनजागृती करण्यासाठी आणि मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय लाक्षणिक निदर्शने करून धरणे धरण्यात आले.
‘दहावी-बारावीचे वर्ष आयुष्याला कलाटणी देणारे असते. आजची कौतुकाची थाप म्हणजे पुढच्या आयुष्याची शिदोरी आहे. आता शिक्षणाच्या शाखा विस्तारल्या असून, तुमच्या आवडीचे क्षेत्र निवडू शकता येईल. जे क्षेत्र निवडाल त्यातील परिपूर्ण ज्ञान घ्या. दहावी-बारावीचे शिखर शेवटचे नसून, आता खऱ्या अर्थाने नवे प्रवेशद्वार उघडले आहे,’ असे प्रतिपादन नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी केले.
क्षत्रिय मराठा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दहावी, बारावीतील गुणवंतांच्या गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या.
भारत शिक्षण मंडळाच्या कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात आज आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विशेष योगसत्राचे आयोजन करण्यात आले होते. रविवारचा सुट्टीचा दिवस असूनही अनेक विद्यार्थी आणि पालकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून योगासनांचे धडे गिरवले.
तिसरी, चौथी आणि सहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाला सामोरे जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांची पूर्वतयारी सुकर व्हावी यासाठी आणि जुन्या अभ्यासक्रमाची उजळणी व्हावी, यासाठी सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. हा उपक्रम स्तुत्य असला, तरी या सेतू अभ्यासक्रमाची दीडशे पानांहून अधिक मोठी असलेली पुस्तके विद्यार्थ्यांच्या पालकांना स्वतः छापून घ्यावी लागणार आहेत.