रत्नागिरी : करोनाचे जगावर आलेले संकट दूर करण्याचे गाऱ्हाणे घालत आणि शासनाच्या नियमांचे शक्य तितके पालन करत आज (एक सप्टेंबर) रत्नागिरी जिल्ह्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : करोनाचे जगावर आलेले संकट दूर करण्याचे गाऱ्हाणे घालत आणि शासनाच्या नियमांचे शक्य तितके पालन करत आज (एक सप्टेंबर) रत्नागिरी जिल्ह्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
रत्नागिरी : करोनाप्रतिबंधाचा उद्देश कायम ठेवून गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांच्या आठ ते १५ दिवसांच्या वास्तव्याबाबत शासनाने स्पष्ट निर्णय घेण्याची आणि नियोजन करण्याची चाकरमान्यांनी मागणी केल्यानंतर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली; मात्र चाकरमान्यांचे विलगीकरण १४ दिवसांचे होणार की सात दिवसांचे, संस्थात्मक की गृह विलगीकरण याबाबत अद्यापही शासन आणि प्रशासनाने काहीही स्पष्ट केलेले नाही. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग या आपल्या मूळ जिल्ह्यात उत्सवासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांबाबतचा कोणताच विषय पुढे आलेला नाही.
मुंबई : गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य शासनाने कोकण रेल्वेमार्गावर गाड्या सोडण्यासाठी केंद्र सरकारशी संपर्क साधावा, असे निवेदन मुंबईतील चाकरमान्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले
कल्याण : गणेशोत्सवाकरिता मुंबई आणि परिसरातून कोकणासह राज्यभरात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना सवलतीच्या दरात एसटीची बससेवा उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन कल्याण ग्रामीण विभागाचे आमदार प्रमोद (राजू) रतन पाटील यांनी परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांना कोकणवासीयांच्या वतीने दिले आहे.
रत्नागिरी : येत्या गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना गृह विलगीकरण १४ दिवसांच्या ऐवजी सात दिवसांचे करावे, अशी मागणी करणारे निवेदन चाकरमान्यांतर्फे रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.
रत्नागिरी : मुंबईतून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची शासनाकडून पुरेशी काळजी घेतली जाणार असून गणेशोत्सवाबाबत लवकरच स्थानिक समित्यांद्वारे निर्णय घेतला जाईल, असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.