बृहन्महाराष्ट्र मंडळाचे पणजीत पहिले मराठी साहित्य संमेलन

पणजी : दिल्ली येथील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने पणजीच्या इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाच्या सहकार्याने येत्या २४ आणि २५ फेब्रुवारी २०२४ रोजी पहिले मराठी साहित्य संमेलन होणार आहे.

‘स्त्री लिखित मराठी कविता’चे गुरुवारी पणजीत प्रकाशन

पणजी : साहित्यलेणी प्रतिष्ठान, ताळगाव संपादित स्त्रीलिखित मराठी कविता या २३ गोमंतकीय कवयित्रींच्या प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे प्रकाशन येत्या गुरुवारी, दि. ४ जानेवारी २०२४ रोजी पणजी येथे होणार आहे.

ग. दि. माडगूळकरांना पणजी येथे काव्यांजली

पणजी : गदिमांना त्यांच्या आईकडून कवितेचे बाळकडू मिळाले. आईवर त्यांची प्रगाढ श्रद्धा होती. त्यांची शब्दसंपत्ती प्रचंड होती. त्यामुळे त्यांच्या कवितेतील शब्दांत सौंदर्य होते. त्यांची तपश्चर्या मोठी होती, असे प्रतिपादन ज्येष्ठ निवेदिका सुकन्या सुजित जोशी यांनी केले.

प्रकाश क्षीरसागर यांचा आयएमबीतर्फे ११ रोजी सन्मान

पणजी : गोव्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि कवी प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांचा येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा या सरकारी संस्थेतर्फे येत्या ११ ऑगस्ट रोजी विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

कथा आणि गीतगायनातून उलगडला शिवइतिहास

रत्नागिरी : शिवजन्म ते शिवरायांच्या राज्याभिषेकापर्यंतची शिवकथा अनुभवताना शिवप्रेमींच्या अंगावर रोमांच उभे राहिले. सुप्रसिद्ध प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे यांनी शिवइतिहास उभा करताना शिवरायांइतकीच किंबहुना त्याहून अधिक जिजाऊंच्या विचारांची देशाला खरी गरज असल्याचे प्रतिपादन केले.

बिग फूट संग्रहालयाची अविस्मरणीय सफर

जागतिक संग्रहालय दिनानिमित्ताने दक्षिण गोव्यातील मडगावजवळील लोटोली गावातील सुप्रसिद्ध बिग फूट संग्रहालयाला कुटुंबीयांसह भेट दिली. ती अविस्मरणीय ठरली.