पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या ‘छात्र प्रबोधन’ या कुमारांसाठीच्या मासिकाने यंदा दिवाळी अंक फोनवर मोफत ऐकण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. यासाठी स्मार्टफोन लागणार नाही आणि इंटरनेटचीही गरज नाही. फक्त साधा फोन, रेंज आणि ऐकण्याचा उत्साह यांची आवश्यकता आहे.