मुंबई : येथील मोडीलिपी मित्रमंडळाचा मोडीदर्पण आणि रत्नागिरीतील कोकण मीडिया या दोन दिवाळी अंकाचे प्रकाशन मुंबईत गुरुवारी (दि. २० ऑक्टोबर) होणार आहे. या समारंभात ‘सुलेखन’कार अच्युत पालव यांना अक्षररत्न पुरस्कार देण्यात येणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मुंबई : येथील मोडीलिपी मित्रमंडळाचा मोडीदर्पण आणि रत्नागिरीतील कोकण मीडिया या दोन दिवाळी अंकाचे प्रकाशन मुंबईत गुरुवारी (दि. २० ऑक्टोबर) होणार आहे. या समारंभात ‘सुलेखन’कार अच्युत पालव यांना अक्षररत्न पुरस्कार देण्यात येणार आहे.
वेगवेगळ्या दैवतांचे वैभवशाली पारंपरिक उत्सव हे कोकणाचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. साप्ताहिक कोकण मीडियाचा २०२२चा दिवाळी विशेषांक याच वैशिष्ट्याला वाहिलेला आहे. त्यासाठी ‘कोकणातील उत्सव’ या विषयावर लेख आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
रत्नागिरी : साप्ताहिक कोकण मीडियाने दीपोत्सव विशेषांकाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या अशोक प्रभू स्मृति कथा स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. पुण्यातील अस्मिता महाजन यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले आहे. सविस्तर निकाल वाचा…
साप्ताहिक कोकण मीडियाने यंदाचा (२०२१) दिवाळी अंक इम्युनिटी या विषयावर काढला आहे. त्या अंकाचे अंतरंग येथे उलगडून दाखवले आहेत. इम्युनिटी या विषयावरचे विविध तज्ज्ञांचे लेख, वैचारिक लेख, इम्युनिटी विशेष व्हिडिओ मालिका, तसंच इम्युनिटी या विषयावर घेतलेल्या कथा स्पर्धेतल्या विजेत्या कथा, अन्य कथा, कविता, व्यंगचित्रं अशी वैविध्यपूर्ण साहित्यिक मेजवानी या अंकात आहे. त्याविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे.
मुंबई : ‘विस्मृतीत गेलेल्या मोडी लिपीला गतवैभव प्राप्त करून देण्यामध्ये आणि नवे मोडी अभ्यासक घडविण्यासाठी मोडीदर्पण दिवाळी अंक महत्त्वाची भूमिका बजावेल,’ असे प्रशंसोद्गार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मोडीदर्पण दिवाळी अंकाच्या प्रकाशनप्रसंगी काढले.
रत्नागिरी : रत्नागिरीतून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक कोकण मीडियाच्या पाचव्या दिवाळी अंकाचे आणि ई-बुकचे प्रकाशन आज (१३ नोव्हेंबर २०२०) रत्नागिरीत झाले. करोनाविषयक कथा स्पर्धाही कोकण मीडियाने या दिवाळी अंकाच्या निमित्ताने जाहीर करण्यात आली होती. त्या स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आला.