कोकणातील उत्सव – कोकण मीडियाच्या लेख व चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

रत्नागिरी : वेगवेगळ्या दैवतांचे वैभवशाली पारंपरिक उत्सव हे कोकणाचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. साप्ताहिक कोकण मीडियाचा २०२२चा दिवाळी विशेषांक याच वैशिष्ट्याला वाहिलेला आहे. त्यासाठी ‘कोकणातील उत्सव’ या विषयावर लेख आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. चित्रकला स्पर्धेत रत्नागिरीतील श्वेता केळकरच्या चित्राचा प्रथम क्रमांक आला असून, लेख स्पर्धेत रत्नागिरीतीलच श्रीनिवास सरपोतदार यांचा प्रथम क्रमांक आला आहे. चित्रकला स्पर्धेचे परीक्षण गोव्यातील चित्रकार आणि कलाशिक्षक राजेंद्र रामचंद्र पराडकर यांनी केले. तसेच, लेख स्पर्धेचे परीक्षण रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद स. मसुरकर यांनी केले. सविस्तर निकाल पुढे दिला आहे.

प्रथम क्रमांक प्राप्त झालेल्या चित्राला मुखपृष्ठावर झळकण्याचा मान मिळाला असून, अन्य विजेत्यांची, तसेच स्पर्धेसाठी आलेली अन्य सर्व चित्रे अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. सर्व विजेत्यांचे लेख, तसेच उत्सवांविषयीचे अन्य २८ लेखही या अंकात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्याशिवाय, राशिभविष्य आणि कथा, कविता, व्यंगचित्रे आदी साहित्यिक फराळाची मेजवानी वाचकांना मिळणार आहे.

साप्ताहिक कोकण मीडियाच्या या संग्राह्य दिवाळी अंकाची किंमत फक्त १५० रुपये असून, खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास अंक घरपोच पाठवला जाणार आहे. त्याशिवाय हा अंक ई-बुक स्वरूपातही उपलब्ध असून, गुगल प्ले बुक्स, मॅग्झटर आणि बुकगंगा डॉट कॉमवर तो वाचता येईल.

चित्रकला स्पर्धा निकाल

प्रथम – श्वेता संदीप केळकर, कुवारबाव, रत्नागिरी

द्वितीय – सुजल मंगेश निवाते, मु. पो. आंबये, ता. खेड, जि. रत्नागिरी

तृतीय – प्रदीपकुमार विष्णू देडगे, सावर्डे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी

लेख स्पर्धा निकाल

प्रथम – लेखाचे शीर्षक : दुद्दुऽम्ऽ नाम्ऽनाम्… एक स्मरणरंजन!

लेखक : श्रीनिवास सरपोतदार, रत्नागिरी

द्वितीय – लेखाचे शीर्षक : केळशीचा रथोत्सव आणि पलित्यांचा नाच

लेखक : धीरज वाटेकर, चिपळूण, जि. रत्नागिरी

तृतीय – लेखाचे शीर्षक : देवरूख निगुडवाडीतील ‘आराधने’ची आगळीवेगळी परंपरा

लेखक : शांताराम बारका गोरुले, निगुडवाडी, देवरूख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी

उत्तेजनार्थ क्रमांक एक – लेखाचे शीर्षक : गोळपच्या हरिहरेश्वर मंदिरातला वैशिष्ट्यपूर्ण कार्तिकोत्सव

लेखक : अविनाश काळे, गोळप, ता. जि. रत्नागिरी

उत्तेजनार्थ क्रमांक दोन – लेखाचे शीर्षक : वालावलपुरी उभा मुरारी, वैकुंठीचा राया…

लेखक : आशीष पणशीकर, वालावल, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

उत्तेजनार्थ क्रमांक तीन – लेखाचे शीर्षक : वाटूळचा शिमगोत्सव

लेखक : विराज विलास चव्हाण, वाटूळ, ता. राजापूर, जि. रत्नागिरी

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, सर्वांशी संपर्क साधला जाणार आहे.

विजेत्यांची चित्रे पाहण्यासाठी, तसेच अंकाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी पाहा सोबतचा स्लाइडशो आणि व्हिडिओ…

अंक घरपोच मागवण्यासाठी संपर्क :
मोबाइल :
9422382621, 9850880119

(फक्त) व्हॉट्सअ‍ॅप : 9168912621

(व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर आपलं नाव, संपूर्ण पत्ता आणि प्रतींची संख्या कळवावी.)

ई-बुक खरेदीसाठी लिंक :

गुगल प्ले बुक्स – https://play.google.com/store/books/details?id=LzaVEAAAQBAJ

मॅग्झटर – https://www.magzter.com/IN/Kokan-Media-Consultancy–Services/Kokan-Media-/News/1099536

बुकगंगा – https://www.bookganga.com/R/8LC78

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply