रत्नागिरी : साप्ताहिक कोकण मीडियाने दीपोत्सव विशेषांकाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या अशोक प्रभू स्मृति कथा स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. पुण्यातील अस्मिता महाजन यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले आहे.

साप्ताहिक कोकण मीडिया रत्नागिरीतून २०१६पासून प्रसिद्ध होत आहे. कोकणातले विविध विषय त्यामध्ये हाताळले जातात. साप्ताहिकाच्या दिवाळी अंकांनी कोकणासह मुंबई-पुण्यात मानाचे स्थान मिळविले आहे. करोनाच्या जागतिक महामारीने इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती या विषयाची मोठी चर्चा सुरू झाली. याच विषयावरील दिवाळी विशेषांकाच्या निमित्ताने इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारशक्ती ही मध्यवर्ती कल्पना घेऊन अशोक प्रभू स्मृति कथा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ‘कोकण मीडिया’चे आधारस्तंभ अशोक वासुदेव प्रभू यांचे गेल्या मे महिन्यात निधन झाले. त्यांचेच नाव स्पर्धेला देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ पत्रकार, चरित्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केले. वेगळा विषय असूनही कथांची मांडणी चांगल्या पद्धतीने कथालेखकांनी हाताळली. त्यामुळे कथालेखन सशक्त होत असल्याचे मत श्री. मसुरकर यांनी व्यक्त केले.
स्पर्धेचा निकाल आणि बक्षिसाची रक्कम
प्रथम क्रमांक : अस्मिता अविनाश महाजन, पुणे (१००० रुपये)
कथेचे शीर्षक : रात्रंदिन आम्हां…
द्वितीय क्रमांक : अमोल अनंत पालये, रत्नागिरी (७५० रुपये)
कथेचे शीर्षक : मृदुंग
तृतीय क्रमांक : नीलेश श्रीकृष्ण कवडे, अकोला (५०० रुपये)
कथेचे शीर्षक : करोनावर मात…
उत्तेजनार्थ (प्रत्येकी २५० रुपये) :
मनीषा चिंतामणी आवेकर, पुणे (कथेचे शीर्षक : आरोग्य हीच संपत्ती)
यशवंत तुकाराम सुरोशे, मुरबाड, ठाणे (कथेचे शीर्षक : इच्छाशक्ती )
अमित पंडित, कनकाडी (संगमेश्वर), रत्नागिरी (कथेचे शीर्षक : अॅटमबॉम्बचा आजार)
स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभपूर्वक करण्याचा मानस आहे. त्याबाबत विजेत्यांशी संपर्क साधला जाईल. सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. सर्व विजेत्यांच्या कथा साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
या स्पर्धेशिवाय अन्य २० कथाही या दिवाळी अंकात समाविष्ट आहेत. त्यात वेगवेगळ्या विषयांवरच्या विनोदी, वैचारिक आदी प्रकारच्या कथांचा त्यात समावेश असून, त्या मराठी आणि मालवणी बोलीतील आहेत.
अंकाची किंमत : १५० रुपये
हा अंक मुंबई, पुणे, रत्नागिरीत विविध ठिकाणी उपलब्ध आहे. अंक घरपोच मागवण्यासाठी कृपया https://wa.me/919850880119 या व्हॉट्सअॅप लिंकवर क्लिक करून आपली मागणी नोंदवावी.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९४२२३८२६२१, ९४२३२९२१६२
हा अंक ई-बुक स्वरूपातही विविध प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे. त्याच्या लिंक्स सोबत देत आहोत.
बुकगंगा डॉट कॉम : https://www.bookganga.com/R/8FEJK
मॅग्झटर : https://bit.ly/3EsKdBy
गुगल प्ले बुक्स : https://bit.ly/2ZE325W
या अंकातील अन्य लेख आणि विविध प्रकारच्या साहित्याविषयी वाचा खालील लिंकवर