दानशूर भक्तिभूषण श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या ८१व्या पुण्यतिथीनिमित्त आज (२४ फेब्रुवारी) रत्नागिरीत विशेष रॅली, सहभोजन आणि सहभजन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
दानशूर भक्तिभूषण श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या ८१व्या पुण्यतिथीनिमित्त आज (२४ फेब्रुवारी) रत्नागिरीत विशेष रॅली, सहभोजन आणि सहभजन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
रत्नागिरी : स्वा. वि. दा. सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज (दि. २६ फेब्रुवारी) त्यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने महाआरती करून अभिवादन करण्यात आले.
‘पतितपावन मंदिर हे भक्तिभूषण श्रीमान भागोजीशेठ कीर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मैत्रीचे प्रतीक आहे. भागोजीशेठ कीर यांच्याकडे जातीय भेदभावापलीकडची मानवतेची दूरदृष्टी होती.
रत्नागिरी : भारताला हिंदुराष्ट्र बनविण्यासाठी स्वा. सावरकर यांनी हिंदुत्व ग्रंथ लिहिला. त्याची यंदा शताब्दी सुरू आहे. भारतीय संस्कृतीचे रक्षण, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सर्वांना जबाबदारी घ्यावी लागेल, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता तसेच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी येथे केले.
रत्नागिरी : शोभायात्रा आणि पतितपावन मंदिरातील सहभोजनाने सावरकर विचार जागरण सप्ताहाची आज रत्नागिरीत सांगता झाली. वीर सावरकरांना अभिवादन करण्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री उदय सामंत, पद्मश्री भिकुजी इदाते उपस्थित होते.
रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार क्रांतिकारक होते. आज भारताला याच विचारांची गरज आहे. असा सूर आज ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उमटला.