रत्नागिरी : भारताला हिंदुराष्ट्र बनविण्यासाठी स्वा. सावरकर यांनी हिंदुत्व ग्रंथ लिहिला. त्याची यंदा शताब्दी सुरू आहे. भारतीय संस्कृतीचे रक्षण, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सर्वांना जबाबदारी घ्यावी लागेल, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता तसेच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी येथे केले.
