रत्नागिरी : पावस येथील स्वामी स्वरूपानंद जयंती उत्सवानिमित्त येत्या रविवारी, दि. १४ डिसेंबर रोजी रत्नागिरी ते पावस पदयात्रा काढण्यात येणार आहे. पदयात्रेचे हे तेविसावे वर्ष आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : पावस येथील स्वामी स्वरूपानंद जयंती उत्सवानिमित्त येत्या रविवारी, दि. १४ डिसेंबर रोजी रत्नागिरी ते पावस पदयात्रा काढण्यात येणार आहे. पदयात्रेचे हे तेविसावे वर्ष आहे.
रत्नागिरी : श्री स्वामी स्वरूपानंदांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित श्रीमद्संजीवनी गाथेतील अभंग गायन राज्यस्तरीय स्पर्धेची रत्नागिरी केंद्राची प्राथमिक फेरी नुकतीच पार पडली. यामधून सृष्टी तांबे आणि आदित्य लिमये या दोघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचा स्वरूप योगिनी पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या सौ. श्रद्धा कळंबटे यांना प्रदान करण्यात आला.
पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे रत्नागिरीतील वरचीआळी येथील अध्यात्म मंदिरात स्वरूपानंद व्याख्यानमाला सोमवार, दि. २२ सप्टेंबरपासून २४ सप्टेंबरपर्यंत दिवस चालणार आहे. यामध्ये तीन व्याख्याने होणार असून या प्रसंगी स्वरूपयोगिनी पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यंदा हा पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या सौ. श्रद्धा कळबंटे, पर्यटन व्यावसायिक सौ. अमृता करंदीकर आणि चिपळूणच्या सौ. मीनल ओक यांना जाहीर झाला आहे.
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेमध्ये रत्नागिरी तालुक्यात सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींच्या श्रेणीत धामणसे ग्रामपंचायतीने प्रथम, तर चवे आणि गोळप या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा पुरस्कार मिळवला. राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनेत कोतवडे ग्रामपंचायतीने पुन्हा एकदा पहिला क्रमांक मिळवला, तर गावखडी आणि निरुळ या ग्रामपंचायतींना दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला.
क्षयरोगमुक्त ग्रामपंचायती म्हणून निवड झालेल्यापैकी कापडगाव, झरेवाडी, पावस, टिके, टेंभ्ये या ग्रामपंचायतींच्या सरपंचांना प्रशस्तिपत्रक आणि सन्मानचिन्ह/पदक देऊन आज प्रातिनिधिक स्वरूपात गौरवण्यात आले.