दापोली : येथील प्रख्यात डॉ. वसंत मोरेश्वर मेहेंदळे (वय ६७) यांचे आज पुणे येथे निधन झाले. विशेष म्हणजे करोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सुचविलेल्या उपायांकडे, तसेच खासगी डॉक्टरांची सेवा घेताना त्यांच्या सुरक्षेकडे शासनाकडून होणारे दुर्लक्ष होत असल्याने कंटाळून जाऊन गेल्या १ सप्टेंबर २०२० पासून त्यांनी आपले ४२ वर्षांचे रुग्णालय कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
