कोकणी खाद्यसंस्कृतीच्या परिसंवादाने चाळवली श्रोत्यांची भूक

कोकणाच्या खाद्यसंस्कृतीविषयीच्या चिपळुणातील एका परिसंवादाने श्रोत्यांची भूकच चाळवली. कोकणी संस्कृतीतील विविध शाकाहारी, मत्स्याहारी मांसाहारी पदार्थांविषयीची सविस्तर चर्चा या परिसंवादात झाली.

कोकणी लोककलांसाठी महामंडळ स्थापण्याबद्दल सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री शिंदे

‘कोकणात लोककलेची समृद्ध परंपरा आहे. त्यामुळे लोककला महामंडळ स्थापन करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. कोकणात पर्यटनाच्या अमर्याद संधी आहेत. यासाठीच कोकण विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या माध्यमातून संपूर्ण कोकणाचा कायापालट कालबद्ध रीतीने होऊ शकतो. मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंत ग्रीनफिल्ड रस्ता तयार झाल्यास पर्यटनवाढीस चालना मिळेल,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

चिपळूणच्या लोककला महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री करणार

चिपळूण : चिपळूण येथील श्री जुना कालभैरव मैदानावर ५ ते ८ फेबुवारी दरम्यान पर्यटन, लोककला, सास्कृतिक, खाद्य महोत्सव रंगणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

श्रीकांत गोवंडे स्मृत्यर्थ लोकमान्य वाचन मंदिराची कथालेखन स्पर्धा

चिपळूण : चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने श्रीकांत गोवंडे स्मृत्यर्थ कथालेखन स्पर्धा आयोजित केली आहे.

लोककला महोत्सवातील स्टॉलसाठी बचतगट, उद्योजकांना आवाहन

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्राने ५ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केलेल्या पर्यटन लोककला सांस्कृतिक कोकणी खाद्य महोत्सवातील स्टॉलसाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चिपळूण लोककला महोत्सवाच्या उद्घाटनाला अभिनेता ओंकार भोजने

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे फेब्रुवारीत होणाऱअया पर्यटन लोककला सांस्कृतिक खाद्य महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला अभिनेता ओंकार भोजने उपस्थित राहणार आहे.