श्रीकांत गोवंडे स्मृत्यर्थ लोकमान्य वाचन मंदिराची कथालेखन स्पर्धा

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने श्रीकांत गोवंडे स्मृत्यर्थ कथालेखन स्पर्धा आयोजित केली आहे.

श्रीकांत गोवंडे

विद्यार्थिप्रिय शिक्षक, नामवंत लेखक आणि संस्कृत भाषेचे गाढे व्यासंगी श्रीकांत प्र. गोवंडे यांच्या स्मृत्यर्थ लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराला दीड लाख रुपयांची देणगी त्यांच्या पत्नी श्रीमती मोहिनी गोवंडे यांनी दिली आहे. या देणगीच्या व्याजातून कै. श्रीकांत गोवंडे यांच्या नावाने परिसरातील लेखक- लेखिकांसाठी प्रतिवर्षी कथालेखन स्पर्धा घेतली जाते. त्यातून उत्कृष्ट कथालेखनाला तीन पारितोषिके देण्याचा निर्णय वाचन मंदिराच्या संचालक मंडळाने घेतला आहे. यापूर्वी श्रीमती गोवंडे यांनी दिलेल्या निधीतून ग्रंथालयाने गोवंडे सरांच्या नावे ध्वनिक्षेपक यंत्रणा घेतली आहे.

चिपळूणच्या युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये गोवंडे सरांनी सुमारे ३४ वर्षे सेवा केली होती. गोवंडे सरांची शंभरहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांनी विविध विषयांवर ग्रंथ लेखन केले होते. अशा बहुआयामी लेखकाच्या नावे मिळणारा पुरस्कार लेखकांना प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास वाचनालयाचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी वाचनालयातर्फे श्रीमती मोहिनी गोवंडे यांना सुगंधी मरवा झाड भेट देण्यात आले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply