साप्ताहिक सत्यशोधकला ‘बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार’ जाहीर

चिपळूण : रत्नागिरी येथून प्रकाशित होणाऱ्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी ‘साप्ताहिक सत्यशोधक’ला येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि अरविंद तथा अप्पासाहेब जाधव अपरान्त संशोधन केंद्रातर्फे देण्यात येणारा ‘बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

चिपळूणला ‘लोटिस्मा’मध्ये महात्मा गांधींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या कलादालन सभागृहात महात्मा गांधींच्या जयंती निमित्ताने आज (२ ऑक्टोबर २०२१) महात्मा गांधींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले.

चिपळूणचा गांधीजींचा पूर्णाकृती पुतळा नव्या रूपात

चिपळूणचे मूर्तिकार कै. रघुवीर कापडी यांनी १९३० च्या दरम्यान ब्रॉन्झमध्ये साकारलेल्या महात्मा गांधींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे फायबरमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. त्याचे अनावरण येत्या गांधी जयंतीला होणार आहे.

ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांना कविवर्य द्वारकानाथ शेंडे पुरस्कार

चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे देण्यात येणारा सामाजिक कार्यासाठीचा कविवर्य द्वारकानाथ शेंडे पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांना जाहीर करण्यात आला आहे.

चिपळूणच्या लोकमान्य टिळक वाचन मंदिरासाठी राज्य शासनाकडून अडीच हजार ग्रंथ

मुंबई : चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या ग्रंथसंपदेचे नुकत्याच झालेल्या महापुरामुळे नुकसान झाले होते. या वाचनालयासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने अडीच हजार ग्रंथ भेट दिले.