ओणी येथे मंगळवारपासून दोन दिवस कोमसापचे साहित्य संमेलन

राजापूर : ओणी (ता. राजापूर) येथे कोकण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस रंगणार्‍या या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिक जागर होणार आहे. या साहित्य संमेलनासाठी कवी केशवसुत साहित्य नगरी सज्ज झाली आहे.

कोमसाप राजापूर संमेलनाची ग्रंथदिंडीने वातावरणनिर्मिती

राजापूर : पारंपरिक ढोलताशाचा गजर आणि वाद्याच्या नादावर सादरीकरण करणारी लेझीम पथके यांनी सजलेल्या राजापूर शहर आणि ओणी बाजारपेठ परिसरामध्ये आज काढलेल्या ग्रंथदिंडीने ओणी (ता. राजापूर) येथे आयोजित केलेल्या कोकण मराठी साहित्य संमेलनाची उत्तम वातावरणनिर्मिती झाली.

सेवा दलाची पंचतत्त्वे घराघरात पोहोचावीत : शहाजीराव खानविलकर

राजापूर : सेवादलाची पंचतत्त्वे राष्ट्र सेवादल शिबिरार्थींच्या माध्यमातून घराघरात पोहोचावीत. त्यासाठी शिक्षणाची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत ओणी (ता. राजापूर) येथील नूतन विद्यामंदिरचे माजी मुख्याध्यापक शहाजीराव भाऊराव खानविलकर यांनी मांडले.

ओणी येथे एप्रिलअखेर राष्ट्र सेवा दलाची दोन शिबिरे

राजापूर : राष्ट्र सेवा दलाच्या ओणी (ता. राजापूर) शाखेतर्फे दस्तनायक आणि समाजभान युवा अशी दोन शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. येत्या २३ ते ३० एप्रिल या कालावधीत ही शिबिरे होणार आहेत.