गणेशोत्सवासाठी रत्नागिरीत येणाऱ्या चाकरमान्यांची होणार आरोग्य तपासणी; महामार्गावर २० पथके

गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांच्या आरोग्य तपासणीकरिता मुंबई-गोवा महामार्गावरच्या प्रमुख १६ ठिकाणी, तसेच खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरी या चार रेल्वेस्थानकांवर आरोग्य तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत.

ग्रामीण आवास योजनांमध्ये धामणसे आणि कोतवडे ग्रामपंचायतींना मिळाला प्रथम क्रमांक

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेमध्ये रत्नागिरी तालुक्यात सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींच्या श्रेणीत धामणसे ग्रामपंचायतीने प्रथम, तर चवे आणि गोळप या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा पुरस्कार मिळवला. राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनेत कोतवडे ग्रामपंचायतीने पुन्हा एकदा पहिला क्रमांक मिळवला, तर गावखडी आणि निरुळ या ग्रामपंचायतींना दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला.

योगदिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा परिषदेतर्फे योगशिबिर आणि औषधी वृक्षारोपण

अकराव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आज रत्नागिरी जिल्हा परिषदेने रत्नागिरी शहरातील उद्यमनगर येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्रात योगशिबिराचे आयोजन केले होते.

रत्नागिरीतील जनता दरबाराला चांगला प्रतिसाद

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज (१७ एप्रिल) जिल्हा नियोजन समिती सभागृहात जनता दरबार आयोजित केला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.