करोना, लॉकडाउन आणि अतिवृष्टीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना नियम पाळून का होईना, पण दसरा उत्साहाने साजरा करायचा होता; देवरुख (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील नागरिकांना मात्र ते शक्य झाले नाही. कारण आधीच लांबलेल्या पावसाने साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याचाही मुहूर्त चुकवला नाही. त्यामुळे नागरिकांच्या उत्साहावर मुसळधार पावसाचे पाणी पडले आणि सोने लुटणे सोडाच, पण पावसानेच जणू देवरुखवासीयांना लुटले, अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली होती.
