कर्णेश्वर मंदिरात २२ डिसेंबरपासून कला संगीत महोत्सव

संगमेश्वर : कसबा येथील श्री कर्णेश्वर मंदिरात कला संगीत महोत्सवाची मेजवानी रसिकांना येत्या २२ ते २४ डिसेंबर या कालावधीत मिळणार आहे. श्री कर्णेश्वर देवस्थान आणि कलांगण-संगमेश्वरतर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्राच्यविद्या अभ्यासकांसाठी, पर्यटकांसाठी आणि शिवभक्तांसाठीही कर्णेश्वर मंदिर हा जिव्हाळ्याचा विषय आहे. याच कर्णेश्वर मंदिराच्या आवारात श्री कर्णेश्वर देवस्थान आणि कलांगण-संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कला – संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात नृत्य, वादन आणि गायन कलांचा आविष्कार अनुभवता येणार आहे. कला रसिकांसाठी ही पर्वणीच असेल.

महोत्सवात ‘नृत्य नाद’ या प्रकारात नृत्य शिरोमणी शिल्पा भिडे-मुंगळे यांचे नृत्य पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या दिवशी ‘संवादिनी एकलवादन’ प्रकारात सूरलयरत्न पंडित विश्वनाथ कान्हेरे यांचे संवादिनी वादन, तर तिसऱ्या दिवशी युवा गायक ओंकार प्रभुघाटे आणि बुवा श्रीया सोंडूर यांचे उपशास्त्रीय अभंग, नाट्यगीताची मैफल रंगणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी करणार आहेत.

या तिन्ही दिवसांच्या कार्यक्रमांचा जिल्ह्यातील रसिकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी निबंध कानिटकर (९४२२३७६३२७), अवधूत जोशी (९४०३०३१५५८), तेजस संसारे (९८६०४०३९२०) किंवा किरण पाध्ये (९४२०५२५६५७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply