ज्येष्ठ हार्मोनियम आणि ऑर्गनवादक पंडित गोविंदराव पटवर्धन यांचा सत्ताविसावा स्मृतिदिन ३० जानेवारी २०२३ रोजी झाला. रत्नागिरीत सुरू असलेल्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेच्या वेळी त्यांना श्रीरंग हेरंब जोगळेकर या रत्नागिरीतील उदयोन्मुख कलाकाराने ऑर्गन वाजवून श्रद्धांजली वाहिली. विशेष म्हणजे स्पर्धेचे परीक्षक धनंजय पुराणिक (डोंबिवली) यांनी त्याला तबल्याची साथ केली.
