रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेचे उद्घाटन २४ जानेवारी रोजी रत्नागिरीत थाटात झाले. संगीत मत्स्यगंधा नाटकाने स्पर्धेला प्रारंभ झाला.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६१ व्या संगीत नाट्य स्पर्धा २०२२-२३ ची अंतिम फेरी रत्नागिरीतील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात सुरू झाली. समारंभाला उद्घाटक म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी पर्शराम केळकर, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे वतीने मनोहर जोशी, परीक्षक मुकुंद मराठे, धनंजय पुराणिक, मेधा गोगटे-जोगळेकर, रवींद्र कुलकर्णी आणि भवानीशंकर ऊर्फ संजय गोगटे उपस्थित होते.
रत्नागिरीतील खल्वायन संस्थेचे प्रदीप तेंडुलकर, राम तांबे, गणेश जोशी, मधुरा सोमण, मुक्ता जोशी, प्रथमेश शहाणे (तबला), निरंजन गोडबोले (ऑर्गन) या कलाकारांनी नांदी सादर करून उद्घाटन समारंभाला सुरवात केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन, दीपप्रज्वलन करून श्रीफळ वाढविण्यात आले. ज्येष्ठ रंगकर्मी पर्शराम केळकर यांनी स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
उद्घाटन समारंभानंतर गोव्यातील यशप्रभा संस्थेने प्रा. वसंत कानेटकर लिखित मत्स्यगंधा नाटक सादर केले. नाटकाचे दिग्दर्शन अविनाश पुर्खे यांचे होते.
राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेली ही राज्य संगीत नाट्य स्पर्धा १७ फेब्रुवारीपर्यंत रत्नागिरीच्या स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात होणार आहे. यावर्षी प्रथमच ही स्पर्धा वातानुकूलित सेवेत होणार आहे.
उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत साहेब यांच्या पुढाकाराने आणि रत्नागिरी पालिकेचे मुख्याधिकारी श्री. बाबर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि उद्योजक बाबू म्हाप यांच्या सहकार्याने ही नाट्य स्पर्धा वातानुकूलित सेवेत होणार आहे. संगीत नाट्य स्पर्धेत भरजरी वेशभूषा आणि प्रकाशयोजना असते. सोबत नाट्यगृहामधील वातावरण उष्ण असते. यामुळे अनेक कलाकारांना संगीत नाटक सादर करताना होणारा त्रास लक्षात घेऊन श्री. सामंत यांनी स्पर्धा वातानुकूलित वातावरणात होण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. शासनाच्या पुढाकाराने यावर्षी सर्व नाटकांचे दृक्श्राव्य माध्यमातून जतन केले जाणार आहे.
उद्घाटन समारंभाला अपर जिल्हाधिकारी श्रीमती साठे, ज्येष्ठ रंगकर्मी परशुराम केळकर, परीक्षक मुकुंद मराठे, धनंजय पुराणिक, सौ. मेधा गोगटे-जोगळेकर, रवींद्र कुलकर्णी आणि भवानीशंकर तथा संजय गोगटे उपस्थित होते.
उद्घाटन समारंभानंतर गोव्यातील यशप्रभा या नाट्यसंस्थेचे वसंत कानेटकर लिखित मत्स्यगंधा नाटक सादर झाले. अविनाश पुरखे यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे.
श्रेयनामावली
लेखक : प्रा. वसंत कानेटकर
दिग्दर्शक : अविनाश पुर्खे
संगीत : पं. जितेंद्र अभिषेकी
नेपथ्य, रंगभूषा, रंगमंच व्यवस्था : प्रसाद लोगडे आणि सहकारी, रत्नागिरी
प्रकाशयोजना : दिगंबर पै आंगले
वेशभूषा : जयंत नाटेकर
पार्श्वसंगीत : शैलेश साळगावकर
ऑर्गन : दत्तराज सुर्लकर
तबला : संकेत खलप
भूमिका आणि कलावंत
भीष्म : अविनाश पुर्खे
शंतनु : प्रेमानंद कळशांवकर
धीवर : सुनील पुर्खे
चंडोल : दादू पार्सेकर
प्रियदर्शन : लाडू पुर्खे
अंबा : सौ. गौरी पिनाक चोडणकर
सत्यवती : सौ. मिताली मातोंडकर
पराशर : पुरुषोत्तम पै

प्रयोगपंचांग
