राज्य संगीत नाट्य स्पर्धेत संगीत मंदारमाला प्रथम; ‘संगीत मल्लिका’ला दुसरा क्रमांक

मुंबई : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे रत्नागिरीत २४ जानेवारी ते १८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत झालेल्या एकसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत संगीत मंदारमाला या नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. परस्पर सहायक मंडळ (वाघांबे), मुंबई या संस्थेने ते नाटक सादर केले होते. गेल्या वर्षीही याच संस्थेच्या संगीत सुवर्णतुला या संस्थेच्या नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला होता. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे आज (२१ फेब्रुवारी २०२३) यंदाच्या स्पर्धेच्या निकालाची घोषणा केली आहे.

कलारंग नाट्यप्रतिष्ठान, वरवडे-खंडाळा (ता. जि. रत्नागिरी) या संस्थेने सादर केलेल्या संगीत मल्लिका या नाटकाला द्वितीय, तर गोव्यातल्या मांद्रे इथल्या सान्वी कला मंच या संस्थेने सादर केलेल्या संगीत अयोध्येचा ध्वजदंड या नाटकाला तृतीय क्रमांक मिळाला आहे. (या नाटकांमधील गाणी, तसेच काही अंश असलेले व्हिडिओज बातमीच्या शेवटी दिले आहेत.)

हौशी रंगभूमीवरील संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या नाट्य कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरते. यंदा या स्पर्धेत २३ नाट्यप्रयोग झाले होते. रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात ते सादर झाले होते.

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मुकुंद मराठे, धनंजय पुराणिक, भवानीशंकर गोगटे, मेधा गोगटे-जोगळेकर, रवींद्र कुलकर्णी यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व पारितोषिक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

रत्नागिरी केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे
दिग्दर्शन :
प्रथम – घनश्याम जोशी (नाटक – संगीत मंदारमाला),
द्वितीय – नितीन जोशी (नाटक – संगीत मल्लिका)

नाट्यलेखन : प्रथम – अमेय धोपटकर (नाटक – संगीत मल्लिका)
द्वितीय – विलास कर्वे (नाटक – संगीत तमसो मा ज्योतिर्गमय)

संगीत दिग्दर्शक : प्रथम – विजय रानडे (नाटक – संगीत मल्लिका)
द्वितीय – निळकंठ गोखले (नाटक – संगीत तमसो मा ज्योतिर्गमय)

नेपथ्य : प्रथम – पायल लोगडे (नाटक – संगीत मंदारमाला)
द्वितीय – अक्षय शेटगावकर (नाटक – संगीत रणदुंदुभी)

संगीत – ऑर्गन : प्रथम – हर्षल काटदरे (नाटक – संगीत मंदारमाला)
द्वितीय – सुनाद कोरगावकर (नाटक – संगीत रणदुंदुभी)

संगीत – तबला : प्रथम – प्रथमेश शहाणे (नाटक – संगीत मंदारमाला)
द्वितीय – सुविशांत बोर्डकर (नाटक – संगीत एकच प्याला)

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक – पुरुष
समीर शिरोडकर (नाटक – अयोध्येचा ध्वजदंड)
मुकुंद वसुले (नाटक – संगीत मत्स्यगंधा)

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक – स्त्री

शारदा शेटकर (नाटक – संगीत रणदुंदुभी),
यामिनी पायघन (नाटक – संगीत मत्स्यगंधा)

संगीत – गायन रौप्यपदक – पुरुष
विशारद गुरव (नाटक – संगीत मंदारमाला)
गोविंद मराठे (नाटक – संगीत एकच प्याला.)

संगीत – गायन रौप्यपदक – स्त्री
जान्हवी खडपकर (नाटक – संगीत मल्लिका)
उर्वी फडके (नाटक – संगीत एकच प्याला)

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे
धनश्री गाडगीळ (नाटक – मेघमल्हार)
करुणा पटवर्धन (नाटक – कट्यार काळजात घुसली)
शरण्या शेणॉय (नाटक – माऊली)
सौम्या आठल्ये (नाटक – मल्लिका)
पूजा लागू (नाटक – तमसो मा ज्योतिर्गमय)
विघ्नेश नाईक (नाटक – हे बंध रेशमाचे)
वसंत शेटगावकर (नाटक – रणदुंदुभी)
स्वानंद देसाई (नाटक – कट्यार काळजात घुसली)
सुहास संत (नाटक – नात्याचं गणित)
अभिषेक जोशी (नाटक – तमसो मा ज्योतिर्गमय)

गायनासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे
सावनी शेवडे (नाटक – सौभद्र)
तन्वी मोरे (नाटक – मल्लिका)
श्रद्धा जोशी (नाटक – अयोध्येचा ध्वजदंड)
सरोज पालडिया (नाटक – त्रिवेणी)
देवश्री शहाणे (नाटक – संगीत मंदारमाला)
सूरज शेटगावकर (नाटक – अवघी विठाई माझी)
कैलास खरे (नाटक – कट्यार काळजात घुसली)
शिवम रायकर (नाटक – सूरसाधक)
दशरथ नाईक (नाटक – अयोध्येचा राजदंड)
सुधांशू सोमण (नाटक – संगीत सौभद्र)

स्पर्धेतील नाटकांची प्लेलिस्ट खाली दिली आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply