महाराष्ट्राचे मत्स्योत्पादन ४७ टक्क्यांनी वाढल्यामुळे देशाची उत्पादनघट कमी होण्यास मदत

मुंबई : देशाच्या सागरी मत्स्योत्पादनात २०२४मध्ये दोन टक्के घट झाली आहे; मात्र महाराष्ट्राचे मत्स्योत्पादन ४७ टक्क्यांनी वाढले आहे. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सीएमएफआरआय) अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. राज्याचे मत्स्योत्पादन वाढल्यामुळे देशाच्या मत्स्योत्पादनातील घट कमी होण्यास हातभार लागला आहे.

मिरकरवाडा बंदराचा विकास १८ नव्हे, १२ महिन्यांत पूर्ण करू : नीतेश राणे

रत्नागिरी तालुक्यातल्या मिरकरवाडा मासेमारी बंदराच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा समारंभ आज (२७ जुलै) राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरविकासमंत्री नीतेश राणे, राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला.

राज्यातील पहिला काचेचा पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नापणे धबधब्यावर; नीतेश राणेंच्या हस्ते उद्घाटन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बारमाही वाहणाऱ्या नापणे धबधब्यावर सिंधुरत्न योजनेतून उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन आज (२२ जुलै २०२५) नीतेश राणे यांच्या हस्ते झाले.

दीपक नागवेकर यांच्या ‘मोरपंखी’ पुस्तकाचे झाले किल्ले रायगडावर प्रकाशन

रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ‘नाचणे क्र. एक’चे उपक्रमशील पदवीधर शिक्षक आणि प्रसिद्ध लेखक दीपक नागवेकर यांच्या ‘मोरपंखी’ या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन आज, १३ जुलै २०२५ रोजी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर झाले.

किल्ल्यांची जागतिक वारसास्थळांमध्ये निवड झाल्याचा नाचणे शाळेत आनंदोत्सव

जागतिक वारसास्थळांमध्ये महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश झाल्याबद्दल नाचणे क्र. १ (ता. जि. रत्नागिरी) जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी आनंदोत्सव साजरा केला.

रायगड, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्गासह छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित

रायगड, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्गासह छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित