रत्नागिरी : आषाढी एकादशीच्या संध्याकाळी (२९ जून २०२३) युवा गायक अभिषेक काळे आणि गायिका सृष्टी कुलकर्णी यांच्या बहारदार आणि भक्तिरसपूर्ण गायनाने रत्नागिरीकर रसिक मंत्रमुग्ध झाले. रत्नागिरीतील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळ आणि सप्तसूर म्युझिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त ‘भक्तिरंग’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे यंदाचे नववे वर्ष होते.
