तळेरे (ता. कणकवली) : साने गुरुजींच्या प्रसिद्ध ‘श्यामची आई’ या पुस्तकाच्या सिंधुदुर्गकन्येने चिनी भाषेत केलेल्या अनुवादाचे प्रकाशन येत्या रविवारी (दि. २९ जानेवारी) मुंबईत होणार आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
तळेरे (ता. कणकवली) : साने गुरुजींच्या प्रसिद्ध ‘श्यामची आई’ या पुस्तकाच्या सिंधुदुर्गकन्येने चिनी भाषेत केलेल्या अनुवादाचे प्रकाशन येत्या रविवारी (दि. २९ जानेवारी) मुंबईत होणार आहे.
रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेचे उद्घाटन आज रत्नागिरीत होणार आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन होईल.
रत्नागिरी : थिबा राजवाड्याच्या प्रांगणात ‘आर्ट सर्कल’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या १६व्या संगीत महोत्सवाने दर वर्षीप्रमाणेच रसिकांना स्वरानंदाची अनुभूती दिली. २१ आणि २२ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या या महोत्सवात आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांनी केलेल्या सादरीकरणातून संगीतप्रेमी रसिकांना नृत्य, ताल, सूर यांचा त्रिवेणी संगम अनुभवता आला. विद्युत रोषणाईत न्हाऊन निघालेल्या थिबा राजवाड्याच्या समोर सादर झालेले शास्त्रीय गायन, सतार एकल वादन आणि ‘तालचक्र’ या सादरीकरणांनी रसिकांना एका वेगळ्याच विश्वात नेऊन ठेवले.
तळेरे (ता. कणकवली) : जागतिक हस्ताक्षर दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन उद्या (दि. २३ जानेवारी) करण्यात आले आहे.
रत्नागिरी : गेली १५ वर्षे रत्नागिरीतील थिबा राजवाड्याच्या परिसरात आर्ट सर्कलतर्फे आयोजित केला जाणारा शास्त्रीय संगीत महोत्सव उद्या आणि परवा (२१-२२ जानेवारी २०२३) होणार आहे.
सहाण (ता. अलिबाग, जि. रायगड) येथील जनशिक्षण संस्थानच्या नव्या इमारतीची आणि तेथील स्वयंपूर्णतेच्या प्रशिक्षणाविषयीची माहिती.