देवगडच्या सौ. ममता धुपकर यांना महिला उद्योगरती पुरस्कार प्रदान

देवगड : जामसंडे (देवगड) येथील श्रीकृष्ण भोजनालायच्या संचालिका सौ. ममता प्रसाद धुपकर यांना महिला उद्योगरती पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे प्रदान करण्यात आला.

अखेर पीओपीची शाळा बदलली पुन्हा मातीच्या मूर्तिशाळेत

पीओपी मूर्तीपासून निसर्गाला प्रचंड मोठ्या प्रमाणात पोहोचणारी हानी, विसर्जनानंतर होणारी मूर्तीची विटंबना याबाबत जनजागृती करण्यासाठी शाळा या लघुपटाची निर्मिती केली आहे.

निरक्षर आजीला अक्षरवारीनंतर मिळाला पांडुरंगाचा प्रसाद

दोडामार्ग : येथील एका पांडुरंगभक्त आजीने करोनाच्या काळात सुरू असलेल्या नातवंडांच्या ऑनलाइन शिक्षणापासून प्रेरणा घेतली आणि या निरक्षर आजीने अक्षरवारी करून पंढरपूरच्या पांडुरंगाला पत्र पाठवले. त्या पत्राला पांडुरंगाने प्रसाद पाठवला आणि तिची वारी पूर्ण केली.