अखेर पीओपीची शाळा बदलली पुन्हा मातीच्या मूर्तिशाळेत

गणेशोत्सव विशेष

ज्या मातीतून घडलास तू त्याच मातीतून घडलो आम्ही…
तुझे देवपण राहिले शाबूत माणूस म्हणून चुकलो आम्ही…

कोकणातील सर्वांत महत्त्वाचा सण गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या उत्सवात मूर्ती पूजनाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. परंतु अलीकडे प्लास्टर ऑफ पॅरीसच्या (पीओपी) क्रेझमध्ये मातीच्या मूर्ती घडविण्याचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. ज्या पारंपरिक मूर्तिकलेने आजपर्यंत हजारो हातांना काम दिले, अतिशय सुबक हाती मूर्ती बनविल्या, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविला, तेच हात पीओपीच्या मूर्तीमुळे भविष्यात रिक्त होऊ लागले आहेत. सर्वसामान्य मूर्तिकारांच्या हातातील कला लोप पावण्याची भीती निर्माण होत आहे. हे सर्व टाळण्यासाठी आणि पीओपी मूर्तीपासून निसर्गाला प्रचंड मोठ्या प्रमाणात पोहोचणारी हानी, विसर्जनानंतर होणारी मूर्तीची विटंबना याबाबत जनजागृती करण्यासाठी शाळा या लघुपटाची निर्मिती केली आहे. हा लघुपट “कान्हा प्रोडक्शन” या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आला आहे.

लघुपटाचे चित्रीकरण कुडाळ तालुक्यातील मांडकुली आणि शेटकरवाडी गावात करण्यात आले असून तेथील स्थानिकांचे खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले आहे. धीरज परब, श्रीराम सडवेलकर, सयाजी मोर्ये, सुभाष लाड, पालव कॅटरर्स, प्रणील नाईक, विनोद नाईक यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले आहे.

लघुपटाचे दिग्दर्शन आणि संकलन किशोर नाईक यांचे असून निर्मिती वैभव सावंत आणि प्रसाद बिड्ये यांची आहे़. संकल्पना सौरभ सर्वेकर, लेखन अजिंक्य जाधव, कॅमेरा संकेत जाधव आणि प्रसाद बिड्ये यांच्यासह दिग्दर्शक विजय वालावलकर, ड्रोन कॅमेरा मिलिंद आडेलकर, मेकअप स्नेहा सडवेलकर, संगीत संयोजन दिनेश वालावलकर, गायक सागर कुडाळकर, पोस्टर वैदेही खोत यांचे आहे. नीलेश गुरव, कांचन धर्णे, अशोक सर्वेकर, मुग्धा शिरसाट, श्रीकांत कासले, रोहिदास चव्हाण, वैभव सावंत हे प्रमुख कलाकार आहेत.

या जनजागृतीच्या माध्यमातून आगामी काळात पारंपरिक पद्धतीच्या मातीच्या गणेशमूर्ती आणि गणेशचतुर्थी उत्सव पाहायला मिळेल, असा विश्वास दिग्दर्शक किशोर नाईक यांनी व्यक्त केला आहे.

शाळा लघुपट पाहण्यासाठी सोबतच्या लिंकवर जा –

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply