निरक्षर आजीला अक्षरवारीनंतर मिळाला पांडुरंगाचा प्रसाद

आषाढी एकादशी विशेष

दोडामार्ग : येथील एका पांडुरंगभक्त आजीने करोनाच्या काळात सुरू असलेल्या नातवंडांच्या ऑनलाइन शिक्षणापासून प्रेरणा घेतली आणि या निरक्षर आजीने अक्षरवारी करून पंढरपूरच्या पांडुरंगाला पत्र पाठवले. त्या पत्राला पांडुरंगाने प्रसाद पाठवला आणि तिची वारी पूर्ण केली.

एखाद्या चित्रपटातच शोभेल, अशी या अक्षरवारीचे चित्रीकरण सिंधुदुर्गातील तरुणांनी केले आहे. ही कहाणी आहे पाल (ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) येथील अंबिका राणे या आजीबाईंची. करोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिकवणी चालू आहे. असेच ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या नातीसोबत अंबिका राणे यांनी आपले शिक्षण सुरू केले. त्यांनी अक्षर ओळख, अंक ओळख करून घेतली. घरातील रोजची कामे करता करता ज्या त्या वस्तूंमधून आजी अक्षरे बनवू लागल्या. विठ्ठलाची भक्ती करणाऱ्या आजीने यंदा स्वतःच्या हाताने पत्र लिहून विठ्ठलाला पाठवले आणि पंढरपूरवरून पोचपावती म्हणून त्यांना प्रसादही आला. खरेच विठ्ठल पावला त्यांना….

खरीखुरी वारीच म्हणायची ही ‘शिक्षणाची वारी’. अशी वारी खऱ्या अर्थाने प्रत्येकाने केली, पुढे नेली तर कोणी निरक्षर राहणार नाही. प्रौढ शिक्षणाची ही नांदीच ठरेल. या साऱ्याचे चित्रीकरण दोडामार्गमध्ये करण्यात आले आहे. त्याची सुंदर संकल्पना आणि दिग्दर्शन सुमित पाटील यांचे असून लेखन डॉ. प्रणव प्रभू यांचे आहे. छायाचित्रण मिलिंद आडेलकर, संकेत जाधव, चिन्मय परब, मकरंद नाईक यांनी केले आहे. त्यांना अर्चना परब, गौरेश राणे, संजय सावंत, तनया सावंत, अजय गवस, नीलेश गुरव यांचे विशेष सहकार्य लाभले.
“पाहावा विठ्ठल…लिहावा विठ्ठल…बोलावा विठ्ठल….” असे नामकरण केलेले हे चित्रीकरण

https://fb.watch/v/ZevG4lo7/

या फेसबुक लिंकवर किंवा

https://youtu.be/ei4ocNHnVDI या यूट्यूब लिंकवर पाहता येईल.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply