रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाविषयक आकडेवारीचा पुन्हा घोळ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१९ जुलै) करोनाचे नवे ३६४ रुग्ण आढळले, तर ३२९ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनामुक्तांची टक्केवारी ९२.५२ झाली आहे. आज जिल्हा रुग्णालयातर्फे नव्या स्वरूपातील अहवाल देण्यात आला असून त्यात पुन्हा एकदा आकडेवारीचा घोळ झाला आहे.

आजच्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – २०५, अँटिजेन – १५९ (एकूण ३६४). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६८ हजार ७२६ झाली आहे.

आज तीन हजार १९९ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात एक हजार ३७५ गृह विलगीकरणात आहेत. सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ७१९, डीसीएचसीमधील ३९९, तर डीसीएचमध्ये २७४ रुग्ण उपचार घेत आहेत. बाधितांपैकी २४५ जण ऑक्सिजनवर, ९५ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या दोन हजार ९६१ नमुन्यांपैकी दोन हजार ७५६ निगेटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्टसाठी पाठविलेल्या चार हजार ४७७ पैकी चार हजार ३१८ अहवाल निगेटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख ४५ हजार ३५८ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. (आज जिल्हा रुग्णालयातर्फे नव्या स्वरूपातील अहवाल देण्यात आला आहे. त्यामध्ये आतापर्यंतच्या निगेटिव्ह अहवालांची आकडेवारी चार लाख ४५ हजार ३५८ देण्यात आली आहे. कालच्या अहवालात चार लाख ६४ हजार ७५८ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आल्याचे नमूद करण्यात आले होते.)

जिल्ह्यात ३२९ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ६३ हजार ५८३ झाली आहे. (कालच्या अहवालात ६२ हजार ८८२ रुग्ण करोनामुक्त झाल्याचे म्हटले होते. आजच्या करोनामुक्तांची संख्या त्यात दिल्यास येणारी आकडेवारी चुकीची येत आहे.)

जिल्ह्यात आज ६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ९५८ झाली आहे. मृत्युदर २.८३ टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ६४३, खेड १७७, गुहागर १४६, दापोली १७४, चिपळूण ३७६, संगमेश्वर १७८, लांजा १०२, राजापूर ११९, मंडणगड २९. इतर जिल्ह्यातील १३. (एकूण १९५८).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply