लांजा : रत्नागिरी जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या माचाळ गावात पार पडलेल्या पहिल्या ऐतिहासिक सापड लोककला आणि पर्यटन महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
लांजा : रत्नागिरी जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या माचाळ गावात पार पडलेल्या पहिल्या ऐतिहासिक सापड लोककला आणि पर्यटन महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पहिल्या चार वर्षांच्या परिषदांमध्ये पर्यटनाचे पर्यटनाच्या विकासाचे अनेक मुद्दे मांडले गेले असले तरी पर्यटन व्यावसायिकांनी एकत्र आले पाहिजे, रस्त्यांसारख्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत आणि आपला व्यवसाय वाढविला पाहिजे, या विचारापलीकडे त्यातून फारसे काही निष्पन्न झाल्याचे दिसत नाही. यावर्षीची परिषद मात्र काहीशी वेगळी ठरली, असेच म्हणावे लागेल. कारण याच परिषदेत अनाहूतपणे मांडल्या गेलेल्या एका मुद्द्यावर एकदम एक कोटीच्या निधीची घोषणा झाली. तेच या परिषदेचे फलित होते.
लांजा : तालुक्यातील माचाळ या थंड हवेच्या ठिकाणी उद्या (दि. ११ मार्च) सायंकाळी सापड लोककला आणि पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गावात सार्वजनिक स्वरूपात प्रथमच होणार असलेल्या या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे.
लांजा : लांजा तालुक्यातील स्वर्गीय सुंदर माचाळ गावात पर्यटन बहरावे या हेतूने राजापूर लांजा तालुका नागरिक संघातर्फे येत्या शनिवारी (दि. ११ मार्च) सापड लोककला व पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने राजापूर तालुक्यातील तळवडे या गावी आठवे ग्रामीण साहित्य संमेलन भरविले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्वर्यु प्रकाश देशपांडे यांनी बोलीभाषा टिकवून ठेवणे किती आवश्यक आहे, याबाबतचे विचार मांडले. बोलीभाषेतून स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडत असते. म्हणूनच बोलीभाषांचे संवर्धन म्हणजे स्थानिक संस्कृतीचे संवर्धनही असते.
तळवडे (ता. राजापूर) राजापूर तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या अर्जुना नदीविषयीची कृतज्ञता समीर देशपांडे या कवीने कवितेतून व्यक्त केली आणि कविसंमेलनात वाहव्वा मिळविली.