मंडणगड : मंडणगडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचे उद्घाटन देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज (१२ ऑक्टोबर) मंडणगडमध्ये केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मंडणगड : मंडणगडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचे उद्घाटन देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज (१२ ऑक्टोबर) मंडणगडमध्ये केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील टाकेडे या गावात ‘हॅबिटॅट फॉर ह्युमन फाउंडेशन’तर्फे उभारण्यात आलेल्या मिलन वृद्धाश्रमाचे उद्घाटन आज (१५ मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
आंबडवे : रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव. आज (१४ एप्रिल) सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या वतीने डॉक्टर आंबेडकर यांची जयंती आंबडवे गावी साजरी करण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्याची निर्मिती १९६० साली झाली. त्यानंतर ६३ वर्षांनी तालुक्यात दिवाणी आणि फौजदारी न्यायालय सुरू झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते आज (८ ऑक्टोबर २०२३) दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाचे उद्घाटन मंडणगडमध्ये झाले.
रत्नागिरी : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या रत्नागिरीतील जन्मस्थानाच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन १४ एप्रिल २०२३ रोजी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. रत्नागिरी नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जन्मस्थान सुशोभीकरणासाठी शासनाकडून साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
आंबडवे (ता. मंडणगड) : जगाला हेवा वाटेल असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक आंबडवे येथे उभारले जाईल. त्यामुळे आगामी काळात चैत्यभूमीप्रमाणेच लाखो आंबेडकरी अनुयायी येथील कार्यक्रमास उपस्थित राहतील, अशी खात्री पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.