संस्मरणीय आणि आदर्श स्मृतिसोहळा

प्रथितयश लेखक जयवंत दळवी यांच्या स्मृतिशताब्दीचा नुकताच समारोप झाला. त्यांच्या आठवणी जपणारा कार्यक्रम त्यांचे मूळ गाव असलेल्या आरवली आणि परिसरात वर्षभर साजरा करण्यात आला. एखाद्या व्यक्तीची आठवण त्याच्या शंभराव्या वर्षात वर्षभर जपणारा असा एखादा कार्यक्रम अनोखाच आहे. सावंतवाडी आणि वेंगुर्ले या तालुक्यांमधील आरवलीच्या परिसरातील त्यांच्या चाहत्यांनी वर्षभर दळवींच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. साहित्य प्रेरणा कट्टा ही आभासी संस्था आणि शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे या शतकमहोत्सवी ग्रंथालयाने हा उपक्रम राबविला. साहित्य रसिक आणि हे साहित्य जतन करणारी, रसिकांना ते पुरविणारी ग्रंथालयासारखी संस्था विधायक हेतूने एकत्र आली की किती उत्तम आदर्श निर्माण होऊ शकतो, हेच या संस्थांनी दाखवून दिले आहे.

आरवलीच्या श्री देव आदित्यनारायण देवस्थानाचा १४७वा वर्धापनदिन उत्सव २५ एप्रिलपासून

आरवली : आरवली (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील श्री देव आदित्यनारायण देवस्थानाचा १४७वा वर्धापनदिन उत्सव वैशाख शुद्ध पंचमी ते सप्तमी (२५ ते २७ एप्रिल २०२३) या कालावधीत होणार आहे. उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे, तसेच वैविध्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

आम्ही मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला, पण आता आम्हाला विचारतो कोण?

मुंबई : करोनाप्रतिबंधक लॉकडाऊनमुळे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून तीन ३ महिने मुंबईत अपुऱ्या जागेत राहावे लागलेल्या चाकरमान्यांची घुसमट आता वाढली आहे. रीतसर परवानगी घेऊन कोकणात येऊ इच्छिणाऱ्या कोकणवासीयांची मोठी निराशा झाली आहे. याबाबतचे पत्र मुख्यमंत्र्यांसह अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.