राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आसावरी शेट्ये यांचे निधन

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या येथील ज्येष्ठ नेत्या आणि रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सदस्या आसावरी शेट्ये (वय ६२) यांचे पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

बालरंगभूमीच्या कला शिबिरात मुलांनी साकारले गणपती

रत्नागिरी : विविध उपक्रम राबविणाऱ्या येथील बालरंगभूमीने आयोजित केलेल्या कला शिबिरात सहभागी झालेल्या मुलांनी गणपतीच्या मातीच्या मूर्ती साकारून गणेशोत्सवाचा आनंद आगळ्या पद्धतीने साजरा केला.

रसिक हमालासाठी पं. भीमसेनजींनी पुन्हा आळवला ‘तीर्थ विठ्ठल’ अभंग

रत्नागिरी : भारतरत्न पं. भीमसेन जोशी एका हमालासाठी `तीर्थ विठ्ठल` अभंग तासभर म्हटल्याचा किस्सा डॉ. सुभाष देव यांनी सांगितला.

… आणि घरात अडकलेली मुले रंगली नाटकात!

रत्नागिरी : करोना आणि त्यामुळे लागू करण्यात आलेले लॉकडाउन यांमुळे सगळ्याच गोष्टींवर विपरीत परिणाम झाले आहेत. प्रचंड ऊर्जा ज्यांच्यात सळसळत असते, अशी लहान मुलेही या लॉकडाउनमुळे घरातच कोंडली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरीत नुकत्याच झालेल्या ऑनलाइन बाल-नाट्य कार्यशाळेमुळे त्यांच्या ऊर्जेला व्यक्त होण्यासाठी चांगले माध्यम उपलब्ध झाले. बालरंगभूमी परिषदेची रत्नागिरी शाखा आणि रत्नागिरी लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

बालरंगभूमी परिषदेतर्फे जुलै महिन्यात ऑनलाइन बाल नाट्य कार्यशाळा

रत्नागिरी : उद्याचे निपुण अभिनेते घडविण्याची ताकद बालरंगभूमीमध्ये असते आणि ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते. सध्या लॉकडाउनमुळे बाहेर फिरण्यावर निर्बंध आलेले असतानाही या प्रक्रियेत खंड पडू नये, म्हणून ऑनलाइन बाल नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बालरंगभूमी परिषदेची रत्नागिरी शाखा आणि रत्नागिरी लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.