बालरंगभूमीच्या कला शिबिरात मुलांनी साकारले गणपती

रत्नागिरी : विविध उपक्रम राबविणाऱ्या येथील बालरंगभूमीने आयोजित केलेल्या कला शिबिरात सहभागी झालेल्या मुलांनी गणपतीच्या मातीच्या मूर्ती साकारून गणेशोत्सवाचा आनंद आगळ्या पद्धतीने साजरा केला. शिबिराच्या अखेरच्या दिवशी मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून जाणारा आनंद आणि त्यांच्या पालकांनी व्यक्त केलेले समाधान शिबिर सार्थकी लागल्याचे सांगून गेले.

मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी बालरंगभूमीच्या रत्नागिरी शाखेतर्फे विविध उपक्रम नेहमीच राबविला जातात. त्याचाच एक भाग म्हणून एक महिन्याचे मूर्तिकलेचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. राजकिरण दळी यांनी मुलांना प्रशिक्षण दिले. शिबिरात १२ मुले सहभागी झाली होती.

शिबिराच्या समारोपाला ज्येष्ठ रंगकर्मी आणि बालरंगभूमीचे सल्लागार अनिल दांडेकर यांची विशेष उपस्थिती लाभली होती. त्यांनी शिबिरात सहभागी झालेल्या मुलांचे तसेच प्रशिक्षक राजकिरण दळी यांचे कौतुक केले.

समारोप समारंभात कार्यकारिणी सदस्य आशीष सरपोतदार आणि योगेश खांडेकर यांनी स्वागत केले.
अध्यक्षा आसावरी शेट्ये यांनी आभार मानले. कार्यकारिणी सदस्य अस्मिता सरदेसाई यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले.

शिबिरात सहभागी झालेल्या मुलांच्या पालकांनी शिबिराविषयी गौरवोद्गार काढले. त्यातील प्रातिनिधिक प्रतिक्रिया अशी :

प्रिय दळी सर,

गेले अनेक दिवस चाललेल्या मूर्तिकला शिबिराचा आज छान समारोप झाला. आमच्या मुलांना मिळालेल्या एका नाविrन्यपूर्ण आणि आनंददायी अनुभवासाठी आपल्याला खूप खूप धन्यवाद.

सर, बालनाट्यामुळे आपलं काही वर्षांपासून पालक आणि मुलांशी एक वेगळं आणि आपुलकीचं नातं तयार झालंय. दिग्दर्शक म्हणून नाटकासाठी पात्रांची निवड करणं, त्यांची तयारी करवून घेणं किती संयमाचं आणि कौशल्याचं काम आहे, हे आम्ही पालकांनी निरीक्षणातून अनुभवलंय. हे सगळं करताना कोणतीही तडजोड न करण्याचा आपला स्वभाव आम्हाला विशेष भावला. कडक आणि शिस्तप्रिय शिक्षक सहसा विद्यार्थ्यांमध्ये अप्रिय असतात, पण दळी सर याला अपवाद आहेत, ते त्यांच्या निरपेक्ष आणि अत्यंत मनापासून शिकवण्याच्या पद्धतीमुळे.

र, आपलं हे नातं कायम असंच राहील आणि आमच्या मुलांना तुमच्याकडून असंच मोलाचं मार्गदर्शन मिळत राहील, याची खात्री आहे. आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा आणि धन्यवाद.

आसावरी मॅडमनासुद्धा खूप धन्यवाद.

आपले,
सर्व विद्यार्थी आणि पालक

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply