अखेर पाकिस्तानला उपरती! लष्करी कारवाई थांबवण्याचा भारत-पाकिस्तानचा चर्चेअंती निर्णय

अखेर आज (१० मे) दुपारी पाकिस्तानला उपरती झाली आहे. पाकिस्तानच्या लष्करी कारवाई विभागाच्या महासंचालकांनी (डीजीएमओ) दुपारी तीन वाजून ३५ मिनिटांनी भारताच्या ‘डीजीएमओं’ना फोन करून चर्चा केली. त्या चर्चेत असे ठरवण्यात आले, की दोन्ही देशांकडून सर्व प्रकारची (जमीन, हवाई आणि सागरी) लष्करी कारवाई आज सायंकाळी (१० मे ) पाच वाजल्यापासून थांबवण्यात येईल.

मैदानवीरांना करावे लक्ष्य

तणावाची परिस्थिती आणि युद्धजन्य परिस्थिती यामध्ये सर्वसामान्य माणसे काय करू शकतात, त्यांनी काय टाळले पाहिजे, काय केले पाहिजे, कोणाशी संपर्क साधला पाहिजे, याबाबतची प्राथमिक माहिती किमान सर्व लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यादृष्टीने किनारपट्टीवरील नागरिकांना अधिक सतर्क राहणे जरूरीचे आहे. यासाठी प्रामुख्याने महाविद्यालयांची मदत घेतली जात आहे. त्याशिवाय ही जबाबदारी अनेक तरुण मंडळी पार पाडू शकतील. तरुण मैदानवीरांना संघटित करायला हवे. त्यांना पुरेसे प्रशिक्षण द्यायला हवे. त्यांच्यामार्फत वाडी-वस्त्यांवरही जनजागरण होऊ शकते.

रत्नागिरी जिल्ह्यात यशस्वीरीत्या पार पडले मॉक ड्रिल

संभाव्य युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पूर्वनियोजनानुसार आज (सात मे) देशभरात ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम अर्थात मॉक ड्रिल पार पडले. रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक ठिकाणी हे मॉक ड्रिल झाले. त्यात रत्नागिरी तहसील कार्यालय, संगमेश्वरमधील हातिव ग्रामपंचायत, दापोलीमधील दाभोळ ग्रामपंचायत, राजापूर नगरपालिका, रत्नागिरी रेल्वे स्टेशन या ठिकाणांसह जेएसडब्ल्यू पोर्ट, आंग्रे पोर्ट, फिनोलेक्स पोर्ट, अल्ट्राटेक कंपनी या प्रमुख चार कंपन्यांचाही समावेश होता.

राज्यात १६ ठिकाणी युद्धसदृश परिस्थितीची रंगीत तालीम; रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचाही समावेश

जम्मू-काश्मिरात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धसदृश परिस्थितीत करावयाच्या कृतीची रंगीत तालीम अर्थात मॉक ड्रिल करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील २५९, तर महाराष्ट्रातील १६ ठिकाणांचा यात समावेश असून, बुधवारी, सात मे रोजी हे मॉक ड्रिल केले जाणार आहे. यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचाही समावेश आहे.