आगाशे विद्यामंदिरात योगदिन साजरा; विद्यार्थी-पालक-शिक्षकांनी केला योगसराव

भारत शिक्षण मंडळाच्या कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात आज आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विशेष योगसत्राचे आयोजन करण्यात आले होते. रविवारचा सुट्टीचा दिवस असूनही अनेक विद्यार्थी आणि पालकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून योगासनांचे धडे गिरवले.

रत्नागिरीतील कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

भारत शिक्षण मंडळाच्या नव्या वास्तूमध्ये कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिराचा प्रवेशोत्सव कार्यक्रम आज (१६ जून) उत्साहात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात गुलाबपुष्प आणि चाफ्याचे फूल देऊन आणि औक्षण करून मुलांचे स्वागत करण्यात आले. बियाणी बालमंदिर व भिडे आजी खेळघरातही शाळा प्रवेशोत्सव साजरा झाला.

तिसरी-चौथीचे विद्यार्थी बनले व्यापारी

रत्नागिरी : येथील भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात तिसरी- चौथीच्या विद्यार्थ्यांनी व्यापारी बनून गणिताचे धडे घेतले.