‘ये’ आप भी ‘करो ना’ : मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहायता निधीत मदतीचे आवाहन

करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी केंद्र, तसेच राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करतच आहे. नागरिकांनीही त्यात ऐच्छिक आर्थिक मदतीद्वारे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पंतप्रधान, तसेच मुख्यमंत्री सहायता निधीच्या बँक खात्यांचे तपशील जाहीर करण्यात आले आहेत.

साप्ताहिक कोकण मीडिया – २७ मार्चचा अंक

सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे २७ मार्च २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवर उपलब्ध आहे.

आठ मार्चनंतर पुण्या-मुंबईतून रत्नागिरीत आलेल्यांनी सक्तीने घरीच राहावे; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

रत्नागिरी : मुंबई व पुणे शहरातून आठ मार्च २०२०नंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेल्या व्यक्तींनी राहत्या ठिकाणातून/घरातून बाहेर पडू नये, असे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर दंडनीय कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

करोनाचे संकट : पंतप्रधान मोदींचा देशवासीयांशी संवाद LIVE

करोना विषाणूच्या संसर्गाने भीषण रूप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांशी संवाद साधत आहेत. भाषणाचा लाइव्ह व्हिडिओ

राज्यात बंदी आदेश लागू; अधिसूचनेतील नियम जाणून घ्या

कोविड-१९ (कोरोना विषाणू) प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून विविध कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचा उपयोग करून संपूर्ण महाराष्ट्रात ३१ मार्च २०२०पर्यंत बंदी आदेश लागू करण्याची अधिसूचना मुख्य सचिव अजोय मेहता यांनी जारी केली आहे. या अधिसूचनेतील नियम जाणून घ्या…

आता फक्त दुचाकींनाच आणि ठरलेल्या वेळेतच पेट्रोल मिळणार

राज्यात २३ मार्च २०२०पासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर, वाहनचालकांना पेट्रोल, डिझेलच्या पुरवठा करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.