शिवछत्रपतींचा पराक्रम समजून घेऊन आज धडे गिरवण्याची गरज : चारुदत्तबुवा आफळे

‘प्रतापगडावर अफझलखानाचा वध करताना शिवछत्रपतींनी गाजवलेल्या रौद्र पराक्रमानंतर हिंदवी स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या शत्रूला मोठा धाक बसला. आताच्या काळात भारताविरोधात अनेक देशांनी कंबर कसली आहे. त्याला तोंड देण्यासाठी शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे धडे आजही गिरवण्याची गरज आहे; मात्र त्यासाठी आधी त्यांचा पराक्रम, त्यांनी केलेली उपासना नीट समजून घेण्याची गरज असून, नंतरच ते धडे गिरवण्यासाठी कार्यवाही करावी,’ असे आवाहन राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्तबुवा आफळे यांनी केले

मठ येथील सोमेश्वर मंदिरात आफळेबुवा रंगविणार अफजल खान वधाचे आख्यान

लांजा : मठ (ता. लांजा) येथील भवानीसोमेश्वर मंदिरात येत्या १३ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत रुद्रानुष्ठान होणार असून त्यानिमित्ताने राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांचे अफजल खान वधाच्या आख्यानविषयावरील कीर्तन होणार आहे.

भारताचा परकीयांवर सात वेळा विजय – चारुदत्तबुवा आफळे

रत्नागिरी : इसवी सनपूर्व ३०० वर्षांपासून भारतावर झालेल्या परकीय आक्रमणांनंतर भारत सात वेळा पराभूत झाला नाही, तर भारताने सात वेळा परकीयांवर विजय मिळविला, असे सांगितले गेले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी केले.

अकबर उदात्त विचारांचा नव्हे, तो तर क्रूरकर्माच – चारुदत्तबुवा आफळे

रत्नागिरी : भारतावर राज्य करणारा अकबर बादशहा उदात्त विचारांचा नव्हे, तर क्रूरकर्मा होता. त्याचे उदात्तीकरण इतिहास महामंडळाने का केले आहे, असा सवाल राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी उपस्थित केला.

मदतीचा हात देणाऱ्या ५१ जणांचा कीर्तनसंध्या महोत्सवात सन्मान

रत्नागिरी : करोनाच्या काळात आणि त्यानंतर उद्भवलेल्या एका वेगळ्या परिस्थितीत गरजूंनान मदतीचा हात देणाऱ्या ५१ जणांचा कीर्तनसंध्या महोत्सवात सन्मान करण्यात आला.

उत्तम संस्कार घडविणाऱ्या शिक्षकांची संख्या घटली – चारुदत्तबुवा आफळे

रत्नागिरी : उत्तम संस्कार घडविणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी झाली आहे, अशी खंत राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी व्यक्त केली.