रत्नागिरीच्या किनाऱ्यावर ४६०० जणांनी केली स्वच्छता

रत्नागिरी : सागरी सीमा मंचाने आज आयोजित केलेल्या स्वच्छ सागर तट अभियानात रत्नागिरीच्या मांडवी किनाऱ्यावर ४६०० जणांच्या समुदायाने स्वच्छता केली. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, ठाण्याचे आमदार आमदार संजय केळकर आणि भारतीय तटरक्षक दल सी. ओ. शत्रुजित सिंग यावेळी उपस्थित होते.

रत्नागिरीत सायकल दिनाची फेरी उत्साहात

रत्नागिरी : जागतिक सायकल दिन आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने आयकॉनिक रत्नागिरीत आज सायकल फेरी पार पडली‌. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून फेरीचा प्रारंभ केला.

रत्नागिरी जिल्ह्यात माती परीक्षण प्रयोगशाळेसाठी प्रयत्न करणार : खासदार विनायक राऊत

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेली माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू व्हावी, यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी दिले.

हापूस आंब्याच्या विक्रीसह कृषी उन्नतीसाठी रत्न कृषी महोत्सव

राज्य शासनाच्या धोरणाअंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादित होणार्‍या हापूस आंब्याच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी रत्नागिरीत १९ ते २१ मे या कालावधीत रत्न कृषी महोत्सव होणार आहे.

कातळशिल्पांच्या अनुषंगाने कोकण पर्यटन मॉडेल बनवावे – जिल्हाधिकारी

रत्नागिरी : कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पे, खाद्यसंस्कृती आणि कोकणची खेळे नमन यांचे एकत्रित बिझनेस मॉडेल बनवावे. कातळशिल्प असलेल्या गावांनी पुढाकार घेतल्यास कोकण समृद्ध होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले.