बदल्यांचे धोरण आणखी सुधारावे

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या यापुढे केल्या जाणार नसल्याची माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीतील पत्रकार परिषदेत दिली. हा अत्यंत चांगला निर्णय आहे. मुळात बदल्या करूच नयेत, अशा आशयाचे संपादकीय कोकण मीडियाच्या यापूर्वीच्या एका अंकात लिहिले होते. हव्यात कशाला बदल्या, या मथळ्याच्या त्या संपादकीयामध्ये सुचविलेला एक बदल राज्य शासनाच्या निर्णयामुळे प्रत्यक्षात आला आहे.

भूजल संपविण्याचा उपक्रम

कृषी पंपांसह जमिनीतील पाणी शोषून घेण्यासाठी अनेक योजना, कर्ज योजना आणि अनुदान तसेच निधी मिळतो. मात्र पावसाचे पाणी साठविण्यासाठी अशी कोणतीही योजना नाही. अल्पदरातील कर्ज नाही किंवा कोणतेही अनुदानही मिळत नाही, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकही पाणी साठवण्याकरिता काहीतरी करू शकेल. एकही शासकीय कार्यालयही पावसाचे पाणी स्वतः साठवत नाही. अधिकारी मात्र पावसाच्या पाण्याची साठवण करणे किती उपयुक्त आहे, हे लोकांना सांगतात. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण या म्हणीचा आणखी दुसरा कोणता दाखला हवा?

हव्यात कशाला बदल्या?

माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या होत नाहीत. कारण ते एखाद्याच संस्थेत काम करू शकतात. विविध जिल्ह्यांमध्ये शाळा असलेल्या मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये बदली होत असली तरी बहुसंख्य शाळा स्थानिक संस्था चालवितात. त्यामध्ये शिक्षक कोणत्याही भागातून येऊन रुजू झाले, तरी त्यांना नोकरीच्या अखेरपर्यंत तेथेच थांबावे लागते. हीच पद्धत प्राथमिक शाळांच्या बाबतीतही अमलात आणायला हवी. त्यामुळे अनेक गोष्टी साध्य होऊ शकतील.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारत विस्तारीकरण बांधकामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आभासी पद्धतीने, तर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत आज झाले. सिंधुरत्न योजनेतून रत्नागिरी जिल्ह्याला विशेष निधी मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.