अवधूत संप्रदाय : सद्गुरू दत्तभक्तीचा सुंदर आविष्कार

आज मार्गशीर्ष शुद्ध १४, बुधवार दिनांक ७ डिसेंबर २०२२ म्हणजेच श्रीदत्त जयंती. त्यानिमित्ताने बाळेकुंद्री (कर्नाटक) येथील अवधूत संप्रदायाविषयी विशेष लेख. सोबत माणगाव (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी यांनी स्थापन केलेल्या दत्तमंदिरातील उत्सवाची क्षणचित्रे.

तेजोमयाचे तेज : विद्याधर भागवत (सिंधुसाहित्यसरिता – १०)

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा दहावा लेख… विद्याधर भागवत यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे वैजयंती करंदीकर यांनी…

भावरम्य श्री क्षेत्र माणगाव

१९९१ साली सत्त्वश्री प्रकाशनतर्फे (अर्थात आताच्या कोकण मीडियाने) प्रमोद कोनकर आणि अशोक प्रभू यांनी संपूर्ण कोकणात फिरून कोकण पर्यटन मार्गदर्शक नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले होते. कोकणातल्या पर्यटनाविषयीचे ते बहुधा पहिलेच पुस्तक असावे. त्याला वाचकांचा चांगला प्रतिसाद तर लाभलाच; पण शासनाचा अष्टगंध पुरस्कारही त्याला मिळाला. या पुस्तकात माणगाव (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील आ. द. राणे गुरुजी यांनी माणगावची माहिती देणारा एक लेख लिहिला होता. काळानुसार माणगावमध्ये बरेच बदल झाले असले, तरी साहजिकच मूळ गोष्टींमध्ये बदल झालेला नाही. माणगावची ओळख या लेखातून होऊ शकेल.