प्रज्ञांगण व्यासपीठ नावलौकिक मिळवेल : पद्मश्री परशुराम गंगावणे 

तळेरे (ता. कणकवली) : ठाकर आदिवासींचे कलांगण आणि तळेरे येथे सुरू होत असलेले प्रज्ञांगण हे दोन्ही भाऊच आहेत. कलांगणने जसे देश-परदेशात नाव कमावले, तसाच नावलौकिक प्रज्ञांगण मिळवेल, याची मला खात्री आहे. या व्यासपीठाचे उद्घाटन संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने झाल्याचे जाहीर करतो, असे प्रतिपादन पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी केले.

तळेऱ्यातील अक्षरघराला कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची भेट

तळेरे (ता. कणकवली) : येथील संदेशपत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी भेट दिली. संग्रहामागील संकल्पना आणि शालेय विद्यार्थ्यांना यातून काय शिकता येईल, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली.

तळेरेचे सुपुत्र ऑक्सिमॅन विशाल कडणे यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक

तळेरे (निकेत पावसकर) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे गावचे सुपुत्र मुंबई स्थित भांडुपमधील तरुण विशाल कडणे स्वतःच्या पदरचे पैसे मोडून रुग्णांसाठी गेली २ वर्षे मोफत मास्क, ऑक्सिमीटरचे वाटप करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून घेतली गेली आहे.

तळेरे महाविद्यालयातील ६४ विद्यार्थ्यांचा अवयवदानाचा संकल्प

तळेरे (कणकवली) : येथील मुंबई विद्यापीठाशी संलग्न विजयालक्ष्मी विश्वभनाथ दळवी महाविद्यालयातील ६४ विद्यार्थ्यांनी मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प सोडला आहे. एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांनी अवयवदानासाठी नावनोंदणी केली असून त्यांनी सर्व समाजासमोर दानाचा एक मोठा आणि आगळावेगळा आदर्श ठेवला आहे.

सिंधुदुर्गातील हस्ताक्षरछांदिष्टाचे मुंबईत शनिवारी प्रदर्शन

तळेरे (ता. कणकवली) : हस्ताक्षरांचा छंद जोपासणारे तळेरे (ता. कणकवली) येथील निकेत पावसकर यांच्या संग्रहातील हस्ताक्षरे आणि संदेशपत्रांचे प्रदर्शन शनिवारी, १३ फेब्रुवारी) मुंबईत दादर येथे होणार आहे.

तळेरे येथील तरुणाच्या पत्रप्रपंचाच्या छंदाला लॉकडाउनमध्ये बहर; मान्यवरांचीही पत्रे प्राप्त

तळेरे (ता. कणकवली) : येथील संदेशपत्र, हस्ताक्षर संग्राहक निकेत पावसकर या तरुणाच्या छंदाला करोनाप्रतिबंधक लॉकडाउनच्या काळात बहरच आला. देशभरातील विविध क्षेत्रातील एकूण ७५० व्यक्तींशी त्याने पत्राद्वारे संपर्क साधला. या काळात त्याला अनेक मान्यवरांची संदेशपत्रे आली असून, त्याचा पत्रप्रपंच अव्याहत सुरूच आहे.