… तर ॲन्टीजेन टेस्ट करूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याबाहेरून प्रवेश करण्याकरिता करोनाप्रतिबंधात्मक लशीच्या दोन मात्रा किंवा प्रवेशापूर्वी ७२ तास पूर्वीचा RTPCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत नसल्यास अशा प्रवाशांची मोफत रॅपीड अँटिजेन तपासणी केली जाईल. तशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आज दिल्या.

गुजरातमध्ये तौते चक्रीवादळाच्या लँडफॉलची प्रक्रिया सुरू

गेले दोन दिवस गोवा-कोकणाच्या समुद्रातून मुंबई-गुजरातच्या दिशेने निघालेल्या तौते चक्रीवादळाच्या (Cyclone Tauktae) लँडफॉलची (Landfall) म्हणजेच किनाऱ्यावर धडकण्याची प्रक्रिया गुजरातमध्ये सुरू झाली आहे. भारतीय हवामान खात्याने आज, १७ मे रोजी रात्री साडेआठ वाजता प्रसिद्ध केलेल्या बुलेटिनमध्ये ही माहिती दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी पहाटे चार वाजल्यापासून तौते चक्रीवादळ

सिंधुदुर्गनगरी : अरबी समुद्रात निर्माण झालेले तौते चक्रीवादळ जिल्ह्याच्या समुद्रात रविवारी, १६ मे रोजी दाखल होत आहे. पहाटे ४ वाजता ते जिल्ह्याच्या समुद्रात दाखल होणार असून दुपारी २ वाजल्यानंतर ते जिल्ह्यातून पुढे जाईल. या काळात नागरिकांनी अधिक दक्ष राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.