कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या वसंतोत्सवात ओंकार फडके, दिलीप रेडकर, जितेंद्र सावंत, लीलाधर भडकमकर यांचा सत्कार

‘कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभा संस्थेचे कामकाज चांगल्या रीतीने सुरू आहे. ब्राह्मण व्यक्तींना एकत्र ठेवून सर्व समाजाचे हित साधणारी ही संस्था कौतुकास्पद कार्य करत आहे. संस्थेला आतापर्यंत जसे सहकार्य केले त्याप्रमाणे कधीही संस्थेच्या मदतीसाठी सदैव सोबत आहे,’ असे प्रतिपादन लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टचे सहसचिव तथा भाजप तालुका सरचिटणीस ओंकार फडके यांनी केले.

दिलीप रेडकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा २०२२-२३ सालचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन येथील आशादीप मतिमंद मुलांच्या पालक संस्थेचे संस्थापक सचिव दिलीप रेडकर यांचा गौरव करण्यात आला.

दिलीप रेडकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार

रत्नागिरी : राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी येथील आशादीप संस्थेचे अध्यक्ष दिलीप रेडकर यांची निवड झाली आहे.

‘आयएमए’कडून ‘आशादीप’ला गाद्या

रत्नागिरी : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष डॉ. तोरल शिंदे आणि सहकाऱ्यांनी आशादीप या दिव्यांग मुलांच्या वसतिगृहात गाद्या दिल्या.

सॅटर्डे क्लबतर्फे वृद्धाश्रम आणि मतिमंदांच्या संस्थेला पाण्याच्या टाक्या

रत्नागिरी : सॅटर्डे क्लबच्या रत्नागिरी चाप्टरतर्फे पावस येथील अनुसूया आनंदी महिला वृद्धाश्रम तसेच रत्नागिरीतील मतिमंदांच्या आशादीप संस्थेला पाण्याच्या टाक्या भेट देण्यात आल्या.

आशादीप संस्थेचे आकाशकंदील, पणत्या विक्रीसाठी सज्ज

रत्नागिरी : येथील आशादीप मतिमंद मुलांच्या संस्थेने तयार केलेले छोटे आकाशकंदील, पणत्या, उटणे, कागदी फुले असे खरेदी करून मतिमंद मुलांच्या स्वयंरोजगाराला हातभार लावावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.