कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने कोकणातील लोककला आणि लोकसंस्कृती या विषयावर लेख स्पर्धा, कथा स्पर्धा आणि रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने कोकणातील लोककला आणि लोकसंस्कृती या विषयावर लेख स्पर्धा, कथा स्पर्धा आणि रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
एकाहून एक अत्यंत बहारदार कार्यक्रम रत्नागिरी महासंस्कृती महोत्सवात सादर करण्यात आले; पण स्थानिक लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी ठिकठिकाणी महासंस्कृती महोत्सव आयोजित केला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते, पण रत्नागिरीत तरी स्थानिक लोककलांना चार तासांपैकी अवघा अर्ध्या तासाचा वेळ देण्यात आला होता. स्थानिक लोककलांना प्रोत्साहन द्यायचे असेल तर स्थानिक लोककलांच्या सादरीकरणासाठी एवढ्या कमी वेळेचे नियोजन कसे करण्यात आले, असा प्रश्न पडतो.
चिपळूण : ‘नागर आणि अनागर ह्या समांतर जीवनशैली आहेत. त्या दोन्ही एकत्र चालणार आहेत. त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडत राहणार आहे. नागर कलांना साचेबद्धता असते. याउलट अनागर लोककलांमध्ये गतिमानता आणि लवचीकता असते. काळानुरूप बदल स्वीकारू शकणाऱ्या या लोककलांना उज्ज्वल भवितव्य आहे,’ असे मत मुक्त पत्रकार आणि लोककलांचे अभ्यासक डॉ. मुकुंद कुळे यांनी व्यक्त केले.
मुंबई : येत्या १८ डिसेंबर रोजी प्रेक्षकांना गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात अदृश्य रंगकर्मी नमन पाहण्याची संधी मिळणार आहे. एकाच दिवशी तीन प्रयोग होणार आहेत.