आयुष शिर्के, अवनी घाणेकर यांनी जिंकल्या सायकली

रत्नागिरी : दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सायकल स्पर्धेत आयुष शिर्के आणि अवनी आशिष घाणेकर यांनी सोडतीतून सायकली जिंकल्या. याशिवाय विजेत्या स्पर्धकांना १० सायकल हेल्मेट आणि इतर अनेक बक्षिसे सोडतीतून वाटण्यात आली.

रत्नागिरीत रविवारी शहरांतर्गत सायकल प्रसार फेरी

रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या रविवारी (दि. २२ मे) सकाळी ६ वाजता रत्नागिरी सायकलिंग क्लबतर्फे शहरांतर्गत सायकल प्रसार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

दापोलीत रविवारी समर सायक्लोथॉन स्पर्धा

दापोली : दापोली सायकलिंग क्लबतर्फे येत्या रविवारी (दि. २२ मे) दापोली समर सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

सायकल फेरी काढून दापोलीत परिचारिकांविषयी कृतज्ञता

दापोली : रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणाऱ्या परिचारिकांच्या योगदानाचे स्मरण करून, त्यांच्याविषयी आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथे सायकल फेरी काढून आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा करण्यात आला.