रत्नागिरीत रविवारी शहरांतर्गत सायकल प्रसार फेरी

रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या रविवारी (दि. २२ मे) सकाळी ६ वाजता रत्नागिरी सायकलिंग क्लबतर्फे शहरांतर्गत सायकल प्रसार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

मारुती मंदिर, फिनोलेक्स कॉलनी, मिऱ्या, स्वा. सावरकर चौक, टिळक आळी, मांडवी, आठवडा बाजार, जयस्तंभ माळ नाका मार्गे पुन्हा मारुती मंदिर असा या सायकल फेरीचा मार्ग आहे. जास्तीत जास्त सायकलप्रेमींनी हेल्मेट आणि पाण्याची बाटली सोबत घेऊन या सायकल फेरीमध्ये मारुती मंदिर येथे सकाळी ६ वाजता सहभागी व्हावे. तसेच १४ वर्षांखालील सायकलप्रेमींनी आपल्या पालकांसह या फेरीकरिता यावे, असे आवाहन क्लबतर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, रत्नागिरी शहर परिसरात सातत्याने सायकलिंगचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या रत्नागिरी सायकलिंग क्लबच्या नवीन जर्सीचे अनावरण पोलिसांच्या वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक शिरीष सासणे यांच्या हस्ते आज मारुती मंदिर येथे एका छोटेखानी समारंभात करण्यात आले. वाहतूक शाखेतर्फे सायकलिस्टना पूर्ण सहकार्य केले जाईल, याची ग्वाही श्री. सासणे यांनी यावेळी दिली. सायकल चालवताना हेल्मेटसारखी सुरक्षा साधने वापरूनच सायकल चालवावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी रत्नागिरी सायकलिंग क्लबचे सदस्य, वॉकर्स ग्रुपचे सदस्य तसेच रत्नागिरीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक महेश गुंदेचा उपस्थित होते. पर्यावरणप्रेमी सायकलिंग क्लबकडून झाडाची रोपे देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

रत्नागिरी सायकलिंग क्लबतर्फे येत्या कॅलेंडर वर्षात एक लाख किलोमीटर सायकलिंग करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. दर दोन महिन्यांनी एक मोठी १०० किलोमीटरची ग्रुप राइड, दर १५ दिवसांनी एक ५० किलोमीटरची ग्रुप राइड रत्नागिरी सायकलिंग क्लबतर्फे केली जाते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

रत्नागिरी सायकलिंग क्लबच्या नवीन जर्सीचे अनावरण

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply