ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेच्या शाळेच्या सहकार्यातून नाचणे येथील छंद वर्ग चालविला जात असल्यामुळे तो पूर्णपणे मोफत आहे. ग्रामस्थ आणि काही देणगीदार यांच्या मदतीतून हा वर्ग चालविला जातो. असा छंद वर्ग चालविणारी नाचणे ग्रामपंचायत बहुधा राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत असावी, पण रत्नागिरी जिल्ह्यातील मात्र जिल्हा परिषदेची ती एकमेव शाळा आहे. नाचणे शाळेचे हेच उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून जिल्हा परिषदेच्या शाळांनीच आता सुट्टीतील छंद वर्गांचे आयोजन करायला हवे.