चिपळूण : चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्वर्यु प्रकाश देशपांडे यांना पुणे येथे ज्येष्ठ इतिहासकार डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते स्नेहांजली पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
चिपळूण : चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्वर्यु प्रकाश देशपांडे यांना पुणे येथे ज्येष्ठ इतिहासकार डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते स्नेहांजली पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चिपळूण : प्रथितयश प्रकाशिका कै. सौ. अंजली रवींद्र घाटपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साहित्यविश्वात मानाचा समजला जाणारा ‘स्नेहांजली पुरस्कार’ यावर्षी चिपळूण येथील संपादक, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश देशपांडे यांना देण्यात येणार आहे.
जिंदाल कंपनीचे निवृत्त जनसंपर्क अधिकारी आणि राजकीय-सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते राजीव लिमये यांनी लिहिलेल्या ‘बखर कर्ल्याची’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (२९ जून) झाले.
‘सध्याच्या काळात वाचन कमी होत चालले आहे. वाचकांची संख्याही कमी होत आहे. माणसे एकमेकांशी बोलण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. संवाद केवळ मोबाइलवरील संदेशाद्वारे होतो. ही परिस्थिती बदलायची असेल, तर घराघरात ग्रंथ घेऊन जावे लागेल. त्यांना ते मोफत वाचायला द्यावे लागतील आणि त्यामधून वाचनाची सवय वाढवावी लागेल,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी केले.
लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराच्या रामभाऊ साठे वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन आज (११ मे) रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते झाले. हे वस्तुसंग्रहालय म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचा अतिशय महत्त्वाचा ठेवा असल्याची भावना डॉ. सामंत यांनी या वेळी व्यक्त केली.
चिपळूण : कोकणाने भारताला अनेक प्रतिभावंत माणसे दिली आहेत. ते लक्षात घेता आता स्वयंपूर्ण कोकण हे मिशन राबवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.